Translate

22 November 2012

उल्लेखनीय कामगिरी...

मी बसून राहते तशीच...
हात-पाय नसलेल्या माणसासारखी...
धावून येणाऱ्या विचारांना...
"हाड" ही न करता येण्याइतपत असहाय...

मग चरफडते स्वप्नांवर..
ज्यात मला पुर्ण डोळे उघडून..
बघताच येत नसतं काही...
सारं बंद-चालू...उघड-मीट..

अश्या वाह्यात स्वप्नांना सोडून येते मी...
पुर्ण न झालेल्या पुलांवर...
पुर्ण न झालेल्या पुलांना कुठेच जाता येत नाही...
बसतात मग तिथेच झूलत...
अपूर्ण स्वप्नांचे जत्थे सांभाळत...

तेव्हा एक सुस्कारा सोडून...
नाठाळ विचारांना शोधून-हुडकून..
श्वासातून...डोळ्यांतून बेदखल करते...

आणि अश्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल...
हात-पाय फुटल्यागत...
एकदम चालायलाच लागते...!


          ...चैताली.

27 October 2012

अलिखिताचे नियम...

अलिखिताचे नियम...
सुप्त राखले उराशी...
खुळ्या आकाशाचे चाळ...
जपले रोज निशेशी...

उद्धृत श्वासांना..
कोण जन्माची धडकी...
समचुकल्या तालाला...
जास्तीची एक गिरकी...!

     ...चैताली.

05 October 2012

The Song....

Days are too long...
My heart is not that strong...
Can't breath the distance...
Between the silence...
And The Song....
.
.
And again
Walking along the beaches...
From the Worlds...

Which I don't belong...


            ....chaitali.

28 September 2012

नको लाऊन घेऊस...

नको लाऊन घेऊस...
दु:खं माझी जिव्हारी....
घेऊन फिरशील डोळ्यांत...
गच्च स्वप्नंलव्हाळी...

माझ्या अश्रूंना...

देवू नकोस थारा...
घेऊन फिरशील साथीला...
मग कोण रौद्र वारा...

माझ्या पापण्यांना...

देशी खांद्यावरी विसावा...
घेऊन फिरशील हृद्याशी...
.
.
मग अवकाश सारा....!

....चैताली.

08 September 2012

"लख्ख-लख्ख"


आता खरं तर मीही...
जायला हवं सारं सोडून...
अज्ञात देशांच्या हाकांना "ओ" देऊन...
जिथे असतात झंकारणारी माणसं...
मिट्ट अंधारातही मिण-मिण....
हसू जपणारी छानसं....
चंपक प्रश्नांचे पूल बनवून....
त्यावर बिनदिक्कत झूलतात...
आणि उत्तरांची फूलं लेऊन...
मंद-मंद अत्तरतात....

रात्रीच्या बातांच्या गाथा...
भल्या पहाटे नदीत बुडवतात...
अन रोज नव्या सूर्याने.....
नखशिखांत तेजाळतात...

दुसऱ्यांच्या दु:खाने....
मणका-मणका शहारतात...
तरीही "आपल्यासारख्यां"कडे बघून...
ती लख्ख-लख्ख हसतात....!

....चैताली.

03 August 2012

डोळे संपेपर्यंत....!!

पावसाच्या वळणा-वळणानं जाताना...
आकाशाचे पंख लेऊन उडणारी..
पाखरं कुजबुजलीच होती....
दुसऱ्या जगांबद्दल...!

म्हणून अथांग आभाळाकडे...
मागितलं काही तर...
ढगांचे ओलेते संभार...
ठेवले अधाशी पापण्यांवर...

गात्रागात्रानं...
दिगंत व्हावं म्हणून...
डोंगरमाथ्यांना....
दिशांच्या शपथा घातल्या...
तर वेल्हाळ सूर्यच...
टाकले झिरमिर पदरात...

आता काही गोष्टींची...
सांगता व्हायच्या आत....
आभाळाकडे...
एकटक बघावं म्हणतेय....
.
.
अगदी ..डोळे संपेपर्यंत....!!


              .....   ...चैताली.

30 July 2012

अल्याड पल्याड...

अल्याड पल्याड...
पापण्यांच्या...
कित्तिक तऱ्हा...
जगण्याच्या...
.
डोळ्यांच्या रित्या...
चौकटीत....
स्वप्नांच्या ओळी...
राखण्याच्या....


....चैताली.