Translate

08 September 2012

"लख्ख-लख्ख"


आता खरं तर मीही...
जायला हवं सारं सोडून...
अज्ञात देशांच्या हाकांना "ओ" देऊन...
जिथे असतात झंकारणारी माणसं...
मिट्ट अंधारातही मिण-मिण....
हसू जपणारी छानसं....
चंपक प्रश्नांचे पूल बनवून....
त्यावर बिनदिक्कत झूलतात...
आणि उत्तरांची फूलं लेऊन...
मंद-मंद अत्तरतात....

रात्रीच्या बातांच्या गाथा...
भल्या पहाटे नदीत बुडवतात...
अन रोज नव्या सूर्याने.....
नखशिखांत तेजाळतात...

दुसऱ्यांच्या दु:खाने....
मणका-मणका शहारतात...
तरीही "आपल्यासारख्यां"कडे बघून...
ती लख्ख-लख्ख हसतात....!

....चैताली.

3 comments:

इंद्रधनु said...

खूप सुंदर... मलाही असंच वाटतंय आता :)

Asha Joglekar said...

खूपच छान.
हे वर्ड वेरिफिकेशन कशाला ?

श्रिया (मोनिका रेगे) said...

सुंदर! आवडली!