जगण्याचं कोलीत हातात घेऊन...
रग्गड श्वास ओतले..
अवधानं अन व्यवधानं सांभाळत..
भासांचे दाखले दिले...
प्रतिसादांचे कांगावे...
थंडपणाचे कंगोरे...
कातडीभर माखले...
अस्वस्थ रकाने..
आकाशभर रेखले...
नादान तोहमतींचे हासू...
नजाकतीने पाळले...
आणि असोशिनं...
सांभाळलं...
.
.
शरीराचं साचलेपण...!
....चैताली.
रग्गड श्वास ओतले..
अवधानं अन व्यवधानं सांभाळत..
भासांचे दाखले दिले...
प्रतिसादांचे कांगावे...
थंडपणाचे कंगोरे...
कातडीभर माखले...
अस्वस्थ रकाने..
आकाशभर रेखले...
नादान तोहमतींचे हासू...
नजाकतीने पाळले...
आणि असोशिनं...
सांभाळलं...
.
.
शरीराचं साचलेपण...!
....चैताली.
3 comments:
क्या बात है, चैताली,
काय गं? प्रत्येक कवितेतुन आम्हा वाचकांना शहारे देण्याचा चंगच बांधला आहेस का तु?
कविता वाचल्यावर ह्या कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ स्वतःच्या आत डोकाऊन पाहाण्याचा मोह मला आवरता आला नाही.
अप्रतिम!
कविता अगदी मनापासुन मनापर्यंत पोहचली.
(हि कविता वाचल्यावर माझ्या मनात जे काही आल ते इथे देत आहे, अन हि एक प्रतिक्रिया म्हणुनच गोड मानुन घ्यावी.)
कधी मिरवलेलं
कधी तुडवलेलं
कधी आवरलेलं
कधी सावरलेलं
कधी भास वाटणारं
कधी भार वाटणारं
कधी बेधूद करणारं
कधी सुन्न करणारं
ते एक वरदान आहे
ते एक शाप आहे
तेच ते...शरीराचं साचलेपण...!
oh thanks abhi... are hya kavita yetat tar ashyach yetat.. agadi khol atun... aani tu connect hotoy tichyashi mhanjech tuhi tevdha khol vichar karatos... tujhi kavita ekdam perfet angle to see this "sachalepan.."
चैतु खुप सुंदर कविता.
Post a Comment