युगोनयूगे...
पिंपळाच्या पानावर...
अलगद सांजतारा ठेवून....
जाळीदार प्रकाश अंगावर लेऊन...
आकाशाशी बोलणारी मी...
स्वत:च्या प्रकाशात मूरलेले (नूरलेले..??)सूर्य...
चांदण्यांच्या पूरात
वाहणाऱ्या चंद्राच्या सावल्या...
कित्येक रातींचा...
पिच्छा पुरवणारे धूमकेतु...
निळाईचा पसाभर वसा घेतलेले
अनाकार मेघ....
सारं सारं... अगदी जसंच्या तसं...
हे सगळं निरस्थपणे...
पाहणारं दुरस्थ आकाश ...
अन् ते माझ्याशीही बोलेल...
म्हणून...
चांदणधूळ जपणारी...
मंत्रस्थ मी...!
---चैताली.
पिंपळाच्या पानावर...
अलगद सांजतारा ठेवून....
जाळीदार प्रकाश अंगावर लेऊन...
आकाशाशी बोलणारी मी...
स्वत:च्या प्रकाशात मूरलेले (नूरलेले..??)सूर्य...
चांदण्यांच्या पूरात
वाहणाऱ्या चंद्राच्या सावल्या...
कित्येक रातींचा...
पिच्छा पुरवणारे धूमकेतु...
निळाईचा पसाभर वसा घेतलेले
अनाकार मेघ....
सारं सारं... अगदी जसंच्या तसं...
हे सगळं निरस्थपणे...
पाहणारं दुरस्थ आकाश ...
अन् ते माझ्याशीही बोलेल...
म्हणून...
चांदणधूळ जपणारी...
मंत्रस्थ मी...!
---चैताली.
8 comments:
सुंदर काव्य! :)
खुपच सुंदर ...आवडलं... :)
कसल्या बेफाम सुंदर कल्पना आहेत..!
चांदणधुळीचा नाद तुम्हालाही आहे तर....चांदणधुळ जपुन ठेवली की नष्ट होत असावी पण उधळली कि नक्षत्रलेणं!
आहा !! सुंदर ..
आकाश धूरस्थ असतं म्हणून तर लोभावतं अन त्याची ती विविध रूपं दिवसा ची रात्री ची त्यात ही चांदणं महणचजे तर क्ल्पनेला धुमारे फोडणारं . सुंदरच .
I’m really amazed by this blog. Tons of useful posts and info on here. Thumbs up,
Some people are too smart to be confined to the classroom walls! Here's a look at other famous school/college dropouts.
Check out here for Smart People
Sundar ahe ga!
Post a Comment