साऱ्या प्रात:निष्ठा छातीपोटाशी घेऊन...
काहीजण...उभे आहेत..कळसांवर...झरोक्यांत...
तेजोवलयं सांभाळत...
साकल्याच्या दिशा लेऊन...
पाहत आहेत...
येणाऱ्या सूर्यांची वाट...
बाकी सारं स्तब्ध...
भिंतींचे चिरेही..नि:शब्द...
त्यांच्यात उगवलेलं एखादं...
पिंपळाचं झाड वाऱ्याशी बोलत आहे...
तेवढंच..
बाकी सगळ्यांकडे...रात्रंच...
त्या निद्रिस्तांच्या तर...
स्वप्नांतही नाहीयेत...
नि:संग पंखांच्या भाषा...
त्यांचं तर आभाळही...
निष्पंख...!
....चैताली.
काहीजण...उभे आहेत..कळसांवर...झरोक्यांत...
तेजोवलयं सांभाळत...
साकल्याच्या दिशा लेऊन...
पाहत आहेत...
येणाऱ्या सूर्यांची वाट...
बाकी सारं स्तब्ध...
भिंतींचे चिरेही..नि:शब्द...
त्यांच्यात उगवलेलं एखादं...
पिंपळाचं झाड वाऱ्याशी बोलत आहे...
तेवढंच..
बाकी सगळ्यांकडे...रात्रंच...
त्या निद्रिस्तांच्या तर...
स्वप्नांतही नाहीयेत...
नि:संग पंखांच्या भाषा...
त्यांचं तर आभाळही...
निष्पंख...!
....चैताली.
6 comments:
sunder....
चैताली सुंदर कल्पना आहे कवितेची....खरच ग ,माणसाच्या मनाचे पंख कधीचेच नाहीसे झाले असावेत...सगळीकडे कृत्रिमपणा नुसता ओसंडतो आहे.
भिंतींचे चिरेही..नि:शब्द...
त्यांच्यात उगवलेलं एखादं...
पिंपळाचं झाड वाऱ्याशी बोलत आहे...
काय लिहिले आहेस हे?
भन्नाट.
मला जर पुढच्या जन्मी काही व्हायचे असेल तर तुझ्या भावविश्वातुन कविता म्हणुन उत्पन्न व्हायला आवडेल.
यापेक्षा जास्त काही लिहु शकत नाही.
अशीच लिहित रहा आणि तुझे भावविश्व जपुन आणि बाहेरच्या जगाच्या शिंतोड्यांपासुन दुर राहु दे अशा मनापासुन शुभेच्छा.
God Bless You!!
thanks Shriya.... ani Abhi this is the biggest comment i have got ever.... thanks a lot dear....!
अप्रतिम...
माझ म्हणण Innocent Warrior पेक्षा वेगळ नाही ...अचाट कल्पनाविश्व आहे ग तुझ...
Post a Comment