Translate

12 January 2012

दुपार .....

भर दुपारच्या...
टांगलेल्या सावल्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या....
कंटाळ्याच्या प्रतिच्या प्रति....!
रद्दीतही देता येत नाही..
ना संध्याकाळी आलेल्या नवऱ्याला...
चहाबरोबर बिस्किट म्हणून...

आंथराव्या त्या मऊशार थंड बेडवर....
तर कुरकूरतात....रात्रीच्या झोपा...!
किंवा अस्ताव्यस्त... स्वत:शीच मारलेल्या
त्याच त्या रटाळ गप्पा...

असे कित्येक कंटाळ...
अन्‌ आठ्या पडलेले असे कित्येक वैताग...
बनतात मग उगाच कानोकानी झालेलं....
एखादीचं नसलेलं अफेअर..!
किंवा हिची..तीची...भिशी....

तरीही संपता संपत नाही...
दिवसाही नाईट-गाऊन घालून फिरणारी...
रोजच्या रोज करवादत येणारी....
दुपार वेडीपिशी....!!


          ---- चैताली.

10 comments:

इंद्रधनु said...

आवडली :) . खरच दुपारी कधीकधी फार कंटाळा येतो

BinaryBandya™ said...

मस्तच कविता .

दिवसाही नाईट-गाऊन घालून फिरणारी
वेडीपिशी दुपार .. सहीच

चैताली आहेर. said...

thank u friends...
बर्याच बायकांना मी दुपारी नाईट-गाऊन घालून फिरताना बघते... I always hated them for such negligence in their appearance..
पण जरा बारकाईने विचार केल्यावर लक्षात आलं की त्यांचं आयुष्यच बहुदा निरस झालं असणार(आता हेही व्यक्ती-सापेक्ष आहे हं...)
आणि मग भिशी- gossips ह्या सगळ्याचा उदय बहुधा कंटाळ्यातून झाला असावा असं माझ्या हुश्शार डोक्याला वाटलं... :p

हेरंब said...

सुंदर कविता.. कंटाळा जाणवला अगदी !!

श्रिया (मोनिका रेगे) said...

मस्त कविता....खूप खरी कविता आहे,दिवस अन रात्रीच्या पसाऱ्यात आपण मांडलेल्या आपला पसारा, प्रत्येकाचा प्रत्येकाने पटकन सावरता येण्याइतपत मांडलेला खेळ,कंटाळा आला तरी दिसू न देण्याइतकी खबरदारी घेणे मात्र गरजेचे असे.आपले मनोरंजन शेवटी आपल्या हातात असते,बाप्पाने नुसते गोसिपिंग करण्यापेक्षा किंवा त्याच त्याच दूरदर्शनवरील ठरलेल्या,पुढे जराही न सरकणाऱ्या मालिकांकडे न पाहता,जरा मोकळा श्वास घेणे गरजेचे आहे...आणि शेवटी चैताली तू म्हणाली आहेस अगदी तसे दुपारच्या वेळी तरी नक्कीच नाईट-गाऊन टाळता येऊ शकेल.....आपला पोशाख नीटनेटका असेल तर उत्साह वाढतो....

Abhi said...

चैताली,

भर दुपारच्या...
टांगलेल्या सावल्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या....
कंटाळ्याच्या प्रतिच्या प्रति....!
रद्दीतही देता येत नाही..
ना संध्याकाळी आलेल्या नवऱ्याला...
चहाबरोबर बिस्किट म्हणून...

क्या बात है. छान कविता.
गृहिणींना दुपारी येणार वैताग फार छान व्यक्त झाला आहे.

आभार,
अभि

Harsha said...

Excellent!!

Keep writing!

चैताली आहेर. said...

आभार.... तुमच्या प्रतिक्रियांचा "कंटाळा" नाय येणार मला कधीच...!! :P

Anonymous said...

खूप खरं लिहीलयंत...

"दिवसाही नाईट-गाऊन घालून फिरणारी...
रोजच्या रोज करवादत येणारी....
दुपार वेडीपिशी....!!"

:)

hemant narkar said...

वाह ...मस्तच...