कुठेच शिल्लक नसणे माझे..
असेच क्षुल्लक असणे माझे..
वाटांवरती चालताना...
सापडती भग्न...
अवशेष माझे...
असेच हकनाक रुसणे माझे...
असेच झाकोळ,विझणे माझे...
स्वत:शीही बोलताना...
श्ब्दांनी होणे
कफ़ल्लक माझे...
असे ’जरा’च दिसणे माझे...
असेच अस्फूट असणे माझे...
उरी फुटताना..
डोळ्यांनी होणे..
अपलक माझे...
असेच मुबलक नसणे माझे
असेच संदिग्ध संदर्भ माझे...
सापडतील फडताळांना...
फुटके तुटके..
अनुल्लेख माझे...!
....चैताली.
9 comments:
कविता आवडली चैत्राली! शुभेच्छा!
कविता खूप छान चैताली ....
आशय खूप छान मांडला आहेस.सोप्या शब्दात पण बरच काही सांगते कविता...
उल्लेखनीय अशी "अनुल्लेख" कविता
abhaar... :)
chhan.
kavita sunder!
खूप छान कविता... आवडली !
चैताली खुप सुंदर
चैताली कृपया माझ्या फेसबुक Id वर माझी मैत्री स्वीकार कर
Post a Comment