पायांना फुटलेल्या वाटा...
कुठेच नेत नाहीत...
उलट धमन्यांमध्ये शिरतात...
अन प्रसवतात... बधिरलेले मेंदू...
ज्यांवर उगवतात..
पंख फुटलेले डोळे...
असे पंख फुटलेले डोळे ... मग...
झेपावतात..दूर...पल्याडच्या क्षितिजांपार..
भरून आणतात तिथल्या आकाशांनी..
मंतरलेल्या भरत्या...
आणि घेवून येतात...
न लागणारं वेड...!
जे फक्त डाचत राहातं...
लागत कधीच नाही...
ते मूरेपर्यंत तरी...
वागवाव्याच लागतात...
शहाण्यासूरत्या पृथ्व्या...
अन चंद्र कोरणारे आकाश....!
....चैताली.
3 comments:
पंख फुटलेल्या डोळ्यांची कल्पना भन्नाट.
न लागणार्या वेडाशी मी सहमत आहे.
आभार.
-अभि
कविता खूप आवडली.चैताली तुझ्या मनातले छानच कळते आहे शब्द बदलेले जग सुरेख दाखवताहेत...
सगळीकडेच हे न लागणारे वेड पसरले आहे....कारण क्षितिजापर्यंत जाण्याशी नुसतीच स्वप्न असत कधी. आता हे वेड त्या क्षितिजाला गवसणी घालण्यासाठी डोळ्यांना पंख देऊ लागले आहे...
सुख खरोखर मानण्यावर आहे आणि मग उरते ते दुखः महासागरा इतके त्यामुळे हर एक क्षण आनंदाचा ठेवा मानायचा आणि पुढे पाहायचे पण पाहणारे डोळे पंख लावून फिरतात....आणि तिकडेच सगळे उसवते.
मस्तच लिहिले आहेस आवडले...:)
छान
Post a Comment