Translate

17 February 2012

मुजोरी...!



सांप्रत मर्यादांच्या आड दडलेल्या..
सांस्कृतिक वल्गना..
आताशा(?) मुजोरी करायला लागल्यात...
योग्य तिथे सुबक..देखणी वळणं घेणाऱ्या रेषा...
हवं तिथे त्रिमिती साधायला लागल्यात...
फोलपटं सरसकट सकसतेचा आव आणून..
फोफावायला लागलीत...
निर्मांध क्षण निर्बंध डावलून....
रान उठवायला लागलीत...
.
.
आणि पिंपळपानं बिचारी...
वंचनेच्या पारावर..
जाळवंडायला लागलीत...!

....चैताली.

4 comments:

K P said...

वंचनेचा पार...वा, आवडलं.छान प्रतिमा.

Shardul said...

"ढळला रे ढळला दिन सखया.."

IT.Manager said...

तुमचा ब्लॉग तुम्हाला पैसे देतो का ? मला देतो..एक छदाम सुद्धा न गुंतवता..!!

अधिक माहितीसाठी हे पहा.

डिजीटल मराठी वाचनालय

http://adf.ly/5advF

Abhi said...

योग्य तिथे सुबक..देखणी वळणं घेणाऱ्या रेषा...
हवं तिथे त्रिमिती साधायला लागल्यात...

क्या बात है.


वाचुन थोडा हरवुन गेलो भुतकाळात माझ्या.