सोप्पं नसतंच
अंधारातून प्रकाशाकडे जाणं
प्रत्येक पाऊल घेऊन येतं
वेगळंच अंधारगर्भी रेशीम...
अथवा असीम काहीतरी...
प्रत्येक पट्टा वेगळा..
आपापल्या परीने
प्रकाश होऊ पाहणारा...
आणि पावलागणिक अंधार पिणारे
आपले पाय...
अंधाराच्या माथ्यावर पाय ठेऊन
प्रकाशी होऊ पाहणारे
बरेचसे स्वार्थीही..
ज्यांचा अंधार-प्रकाशाच्या नात्याशी
उपरा संबंध..
तरीही शेवटच्या क्षणी
उजळलेले डोळे
गप्पकन मिटावेच लागतात..
(अंधाराचं ऋण फेडण्यासाठी..??)
...चैताली.
No comments:
Post a Comment