अस्सं झालंय झाड माझं.....
पानोपानी बहरलेलं...
उमलता-उमलता डवरलेलं....
उगाचंच बावरलेलं...
हात हाती घेता...
मन लागले नाचू....
स्पर्शात अशी तुझ्या...
काय आहे जादू...
कळी-कळीने आता...
स्वप्नं नवं ल्यायलेलं..
अस्सं झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं... ॥१॥
ओठांवर माझ्या...
खट्याळ तूझे हासू...
मी तूझीच.. तू माझा...
नको ना असा रुसू...
थरारल्या मना...
आताच सावरलेलं...
अस्सं झालंय झाड माझं..
पानोपानी बहरलेलं... ॥२॥
आताशा मी जरा...
सावरून रहाते...
फूलले मी तरीही...
सुगंध आवरून घेते...
सळसळ पानांना ...
कितीदा रागावलेलं...
असां झालंय झाड माझं...
पानोपानी बहरलेलं.... ॥३॥
---चैताली.
2 comments:
उमलत माझे झाड फुलले
लाजाळू मी स्पर्शाने गं लाजले
हंसण्यातच अन मी खळखळले
फुला-फुलां मधून बहरले
पाना-पानां मधून डंवरले
मी माझे पण त्यात हरवले !
चैताली, फार दिवसाने तुझी एक छान कविता वाचायला मिळाली व मीही त्यात हरवलो.
पानो पानी डवरलेलं हे झाड सुखवून गेलं.
Post a Comment