Translate

23 March 2014

.धाव.



धावत्या रस्त्याबरोबर
सुस्साट सुटताना...
वाराही मागे पडतो

मी बनते त्या
वेगजन्य रस्त्याचा एक भाग...

इतकंच
जाणवत असतं...
जात राहायचं असतं
प्रकाशाच्या रेघांना
मागे टाकत

मात्र एकाएकी आतून
स्तब्ध होते मी...
जाणवतं

पोहोचण्याचं ठिकाणच
माहीत नाही आपल्याला

मी थांबते
वारा थांबतो..
रस्ताही थांबतो....!!

       ...चैताली.

1 comment:

Samir said...

पोहोचण्याचं ठिकाणच
माहीत नाही आपल्याला...

"कुंपणापलिकडचे शेत" ह्या कथेमधेही (कथासंग्रहः जॉर्जेट लेखकः माधव मनोहर ) मुक्कामाच्या ठिकाणाबद्दल असंच काहीसं म्हटलेलं आहे.