Translate

10 May 2012

काही पक्षी...

कोणी आलंच तर...
सांग मी नाहीये म्हणून...
माझ्यातले काही पक्षी...
दूर गावा गेलेत...
आकाशांदरम्यान त्यांनी..
पसरलेले पंखच...
आता माझ्या डोळ्यांत उतरले आहेत...
.
पुन्हा ओळख-बिळख
शोधत बसतील...
माझ्या बिन-चेहऱ्यावर लोक...

(माझी काही पीसं...
ठेव मात्र जपून...!)


      ....चैताली.




3 comments:

Abhi said...

पंखाचा रंग, खाण्याच्या सवयी आणि अंगाची ठेवण,
आणि नोंदवत राहातील वहित असली फालतु टिपणं.

मनात असतात, विरहत रहातात, कित्येक हजारो पक्षी
,पण ते म्हणतात सांभाळ करा दुर्मिळ आहेत हे पक्षी.

चैताली आहेर. said...

are tujhi comment mhanjech ek kavita ahe.... very true...!thanks...

हेरंब said...

शेवटच्या दोन ओळी प्रचंड टोचल्या !