चल..
काहीतरी creative करू...
तोडमोडके पुराना..
काहीतरी new seek करू..
मी Doremon..तू रडका Nobita..
कार्टून प्रश्नांसाठी..
अवघड gadgets बनवू...
खोलीभर पसरलेल्या..
सकर्मक-अकर्मक प्रश्नांचे कपचे उचलत...
उफराटे (उरफाटे) उत्तर-पाणी खेळू...
अंधार पाळणाऱ्या काटेकोर रातीला...
डिम लाईट्स ची दाखवू भिती..
एकमेकांच्या उश्यांची पिसं काढत..
बेडवर झोपवू चालीरीती...
"Gender- the जानवर " मूव्ही बघताना...
"अंतर्वस्त्र" एक्सचेंज करू..
मग लख्ख सारं सारं पुसून...
अनोळखी चेहऱ्याने..
घट्ट मिठी मारू...
चल ना यार...
आज कुछ तुफ़ानी करू...!
...चैताली.
4 comments:
असं वाटतं खरं कधी कधी कि,
चल ना यार तूफानी काही तरी करू ।
thanks Ashatai... mala hyamadhye kay mhanaychay te pohochala asel tumachyaparyant...!
पुन्हा एकदा "कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है मायाजाल" ची आठवण झाली... तोच मैल आणि मायाजाल ही जगाची "चालरीत" आहे हे किती चपलखपणे लिहून गेलीस. ते एकदा कळले की मग Gender, Janwar ह्या सगळ्या बस्स "मुव्ही" होतात... आणि आपण त्या "पडद्याच्या" बाहेर बसलेले बस्स एक प्रेक्षक ! आयुष्याकडे त्रयस्थपणे बघण्याची ही अवस्था एकदा प्राप्त झाली की मग "अंतर्वस्त्रे" जाणवू लागतात. पण ती "एक्स्चेंज" करणे, नक्कीच तितके सोपे नाही. आणि म्हणूनच तर ती एक कवीकल्पना अगदी "तुफानी" बनून येते.... तुफानी.
tufaan visuals ..
अंधार पाळणाऱ्या काटेकोर रातीला...
डिम लाईट्स ची दाखवू भिती..
एकमेकांच्या उश्यांची पिसं काढत..
बेडवर झोपवू चालीरीती...
Post a Comment