मला कळतं...!
असं म्हटलं ना....
की दारं बंद करतो आपण...
निचरा-निचरा होऊन येतं सारं....
इतकं परफ़ेक्ट की...
आपण पाळायला लागतो ते...
फ़्रेम करून...भिंतीवर लाऊन...
हाताची घडी...चष्मा लाऊन बघताना...
स्वत:वरच खुष होत...
डोळे मिटून...
गलेलठ्ठ..साचेबद्ध मांजर होतो आपण...!
अं..हं..! नकोच ते...
मग काय करावं...
फटीऐवजी.. मोठ्ठं अवकाश घ्यावं..
मोकळं एकदम...
हात पसरून.. डोळे बंद करून..
उभं राहावं त्याखाली...
धपाधप..धडाधड...
सारं सारं...येऊ द्यावं अंगावर....
मग हळूच डोळे उघडून...
एक-एक निरखत...चापसत...
आवडलेलं खिशात भरून घ्यावं...
लब्बाड मुलीसारखं...!
.....चैताली.
3 comments:
अप्रतिम !!
डोळे मिटून...
गलेलठ्ठ..साचेबद्ध मांजर होतो आपण...!
दार उघडून आकाश अंगावर घ्यायला हवंय .
मस्तच ।
bhannat....ekdam
Post a Comment