आजच नेमकी मी कशी विसरले...दिवा लावायला.......
आणि तीच वेळ अंधाराचे फावायला....
भिती वाटतच नाही आता अंधाराची...
केव्हाच माफ़ केल मी त्याला....
रडतोय आजकाल स्साला.....!!
उत्क्रांती झालीय माझी........
अश्रूंनाही भटकू देत नाही.... आसपास....
निचरतेय एक-एक रात..... सावकाश....
अश्रूंचीही आजकाल "आय-माय" काढते...
दु:खाला solid शिव्या घालते....
आता जास्त काही करत नाही....
..... मात्र एक करते...रोज एक..
कविता पाळते........!!!
------ चैताली.
2 comments:
मात्र एक करते...रोज एक..
कविता पाळते........!!!
मस्त.
बरीच उलट सुलट घुसळलेय कविता...
शेवट मात्र अप्रतिम..
Post a Comment